भारताची राज्यघटना दिनाांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी स्वीकारण्यात आली. या ननमित्ताने प्रत्येक वर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस ‘सांववधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारतीय सांववधान दिनाांक २६ जानेवारी, १९५० पासून अांिलात आले आहे. त्यािुळे २६ जानेवारी हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो.
सिर दिवस हा िेशाच्या स्वातांत्र्याचा आणण लोकशाही िूलयाांचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. या दिवशी आपलया िेशाची सिृद्ध सांस्कृती, इनतहास आणण भववष्य याबद्िल ववद्यार्थयाांिध्ये अमभिान ननिााण करणे अत्यांत िहत्त्वाचे आहे. त्या अनुर्षांगाने आिच्या शाळेत प्रत्येक वर्षी २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
प्रजासत्ताक दिनाननमित्त शाळेत शासन पररपत्रकानुसार ववववध उपक्रिाांचे आयोजन करण्यात आले.
शाळेच्या पररसरात सवा ववद्यार्थयाांनी िेशभक्तीपर गीताांवर सािूदहक कवायत सांचालनाचे अनतशय सुांिररीत्या सािरीकरण केले.
शाळेिध्ये ध्वजारोहणानांतर ववद्यार्थयाांनी राष्रगीत गायन, राज्यगीत गायन, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे वाचन, िेशभक्तीपर गीत गायन केले व शाळेच्या पररसरात प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. सवा ववद्यार्थी यात अनतशय उत्साहाने सहभागी झाले.
त्याचप्रिाणे ववद्यार्थयाांनी ननबांध, कववता वाचन, चचत्रकला, भार्षण, हस्तकला अशा ववववध उपक्रिाांिध्ये अनतशय उत्स्फूतापणे आणण दहरीरीने सहभाग नोंिवला. या उपक्रिाांची काही क्षणचचत्रे पुढीलप्रिाणे :
इंडियन एज्युकेशन संस्थेच्या राजा शिवाजी विद्यालयात दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी My India, My Vote या संकल्पनेवर आधारित सोळावा राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये व समाजामध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करणे व लोकशाही मूल्यांची जाणीव करून देणे हा होता.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी प्रभात फेरीने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी हातात फलक, पोस्टर्स घेऊन मतदानाचे महत्त्व सांगणारी घोषवाक्ये देत परिसरात प्रभात फेरी काढली. या फेरीमुळे नागरिकांमध्ये मतदानाविषयी सकारात्मक संदेश पोहोचला.
यानंतर विद्यालयात मतदार शपथ घेण्यात आली. उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांनी देशाच्या लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याची, मतदानाचा हक्क जबाबदारीने वापरण्याची व इतरांनाही मतदानासाठी प्रेरित करण्याची शपथ घेतली.
कार्यक्रमांतर्गत घोषवाक्य स्पर्धा व मतदार जनजागृतीसंबंधी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत प्रभावी, प्रेरणादायी घोषवाक्ये सादर केली. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांची सर्जनशीलता व सामाजिक जाणीव दिसून आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रम लोकशाही मूल्ये रुजवणारा व प्रेरणादायी ठरला.
राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मतदानाचे महत्त्व, नागरिकांची जबाबदारी व लोकशाहीची ताकद याविषयी सखोल जाणीव निर्माण झाली.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ५ सप्टेम्बर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
या निमित्त इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडली. इयत्ता ५ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनुभव त्यांनी मिळवला . तसेच मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या भूमिका पार पाडत एक दिवस शाळा चालवण्याचा अनुभव घेतला.
शिक्षकांसाठी सुप्रसिद्ध समाजसेविका श्रीमती ज्योती जपे याचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
आईएएस राजा शिवाजी विद्यालया मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी निसर्ग मंडळ आयोजित चला बनवू आपल्या बाप्पा कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी शाडू माती लाल माती रंगीत मातीचा उपयोग करीत सुंदर सुबक पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविल्या.
या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना आमच्या शाळेतील दक्ष मालपोटे या (9/A) विद्यार्थ्यांने मार्गदर्शन केले.
1. गणपती बनविण्यात दंग असणारे आमचे विद्यार्थी