२६ जुलै २०२६ रविवार विद्यार्थी उत्कर्ष मंडळ, मुंबई आयोजित विद्यार्थ्यांसाठी खुली स्पर्धा- २०२६ कु. वेद गणेश ढोके- चित्रकला - तृतीय क्रमांक व कु. अक्षरा समाधान पाटील-सुंदर हस्ताक्षर – द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
शाळेचा निकाल- १०० % यशाचे मानकरी व त्यांना सहकार्य करणारे मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी .
दिनांक-१४ फेब्रुवारी २०२६-महाराष्ट्र पुरोगामी संघटना –आयोजित आदर्श मुख्याध्यपिका पुरस्कारच्या मानकरी- श्रीमती कांचन सुनील सावंत. आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी- श्री. कमलाकर श्रीकृष्ण रडे व श्री. किसन वामन जाधव तसेच नवरंग स्पर्धा – रंग पिवळा –प्रथम क्रमांक व रंग राखाडी चतुर्थ क्रमांक प्राप्त
दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ शनिवार या दिवशी ‘रस्ता सुरक्षा’ या अंतर्गत एक कार्यक्रम घेण्यात आला. त्यात मुलांनी आपल्या संकुलात(कॅम्पस) आणि रस्त्यावर जाऊन लोकांना प्रश्न विचारले व ज्यांनी वाहतूकीचे नियम मोडले होते त्यांच्या गाड्यांवर उल्लंघन सूचना (violation notice) व संदेश लिहून त्यांना वाहतूक सुरक्षेबाबत जागृत केले. तसेच आपल्या शाळेतील Road Safety Ambassadors ना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांना प्रोत्साहित केले गेले..
पद्माकर ढमढरे ललितकला महोत्सव कुमार तेजस एकनाथ अभंग उत्तम नाट्य अभिनय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
पद्माकर ढमढेरे ललितकला महोत्सव कुमारी पूर्वा चंद्रकांत खैर सोलो नाट्यगीत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
पद्माकर ढमढरे ललितकला महोत्सव ‘मना घडवी संस्कार’ नाटकास नेपथ्य फिरती ढाल प्रथम क्रमांक.
पद्माकर ढमढरे ललितकला महोत्सवात आय.इ.एस आदर्श गुरुकुल तर्फे घेण्यात आलेल्या डॉक्टर जोशी लेख स्पर्धा मराठी विभाग यात माननीय मुख्याध्यापिका श्रीमती कांचन सुनील सावंत यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या शिक्षण आणि साक्षरता विभागाने ' प्रेरणा एक अनुभवात्मक शिक्षण ' कार्यक्रम सुरू केला आहे. ज्याचा उद्देश सर्व सहभागींना अर्थपूर्ण, अद्वितीय आणि प्रेरणादायी अनुभव देणे आणि त्याद्वारे त्यांना नेतृत्वगुणांनी सक्षम करणे आहे. अशा या भारत सरकार आयोजित कार्यक्रमासाठी आय. इ. एस. दिगंबर पाटकर विद्यालय, दादर शाळेतील कु. तेजस एकनाथ अभंग या विद्यार्थ्याची ३० एप्रिल २०२५ च्या प्रश्नमंजुषाच्या चार फेऱ्या पूर्ण केल्यानंतर मुंबई जिल्ह्यातून निवड झाली असून त्याला वडनगर, जिल्हा मेहसाणा, गुजरात या ठिकाणी २० सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या एक हप्ता निवासी ' प्रेरणा उत्सव ' कार्यक्रमासाठी संधी मिळाली.
या उत्सवात मुंबई जिल्ह्यातून फक्त दोन विद्यार्थ्यांची निवड झाली.
मुंबई शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत २०२५-२०२६ कुमारी. संस्कृती शिंदे द्वितीय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !
माननीय मुख्याध्यापिका श्रीमती. कांचन सुनील सावंत यांना त्यांच्या समर्पित शिक्षण कारकिर्दीबद्दल *शाहू महाराज पुरस्कार* माजी खासदार, माजी आमदार, ब्रिगेडियर श्री. सुधीर सावंत यांच्या हस्ते ५ जुलै २०२५ रोजी गौरव करण्यात आला.
आपल्या शाळेच्या आदरणीय मुख्याध्यापिका श्रीमती कांचन सुनील सावंत यांना'आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार-२०२५. तसेच श्री रमेश बोरासे व श्रीमती दर्शना राजेश ब्रीदशिंदे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.