इंडियन एज्युकेशन सोसायटी आणि ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंट (AILSG) यांच्या संयुक्त कौशल्य इंद्रधनु प्रकल्प व्यवसाय शिक्षण उद्घाटन समारोह (इयत्ता–६ वी)
प्रमुख पाहुणे
१) मा. श्रीम. मधुरा पळणीटकर
२) मा. श्री. योगेश राठोड
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः |
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ||
आषाढी एकादशी निमित्ताने शाळेत विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते.
१) चित्र स्पर्धा या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाई , वारी ,वारकरी किंवा संतांची चित्रे काढली .
२) रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला
अंकुर प्रतिष्ठान तर्फे शाळेत आनंददायी शनिवार साजरा करण्यात आला. या उपक्रमात गप्पागोष्टी, गाणी, खेळात विद्यार्थ्यांनी खूप उत्साहाने भाग घेतला.
या दिवशी ‘विद्यार्थी सुरक्षा समिती’ अंतर्गत स्पर्श तर्फे गुड टच आणि बॅड टच ओळख व विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी माहिती सत्र आयोजित केले होते. व्याख्याते श्रीमती ज्योती देसाई व श्रीमती हेमल शेठ.
अंकुर प्रतिष्ठान तर्फे शाळेत आनंददायी शनिवार साजरा करण्यात आला. या उपक्रमात गप्पागोष्टी, गाणी, खेळात विद्यार्थ्यांनी खूप उत्साहाने भाग घेतला.
पर्यावरण संवर्धन, शून्य कचरा संकल्पना आणि सेंद्रिय जीवनशैलीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने शाळेच्या निसर्ग मंडळातर्फे “संपदा” या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमासाठी पर्यावरण अभ्यासक व मार्गदर्शक श्री. तुषार देंसाई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या उपक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
निर्भया पथक कार्यक्रमा अंतर्गत माटुंगा पोलीस स्टेशन आयोजित व्याख्यान
इंडियन एज्युकेशन सोसायटी आणि ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंट (AILSG) यांच्या संयुक्त कौशल्य इंद्रधनु प्रकल्प व्यवसाय शिक्षण उद्घाटन समारोह (इयत्ता–६ वी) दिनांक – ०२/०७/२०२६ (निज ज्येष्ठ कृ. २)
प्रमुख पाहुणे
१) मा. श्री. जयराज फाटक साहेब
(अध्यक्ष – AILSG)
२) मा. श्री. RTN तुषार रणपारा
(रीगल अध्यक्ष – रोटरी क्लब ऑफ मुंबई, आयलंड सिटी)
३) मा. डॉ. (प्रो.) स्नेहा पलनिटकर मॅडम
(CEO – AILSG)
नवशक्ती वर्तमानपत्रात आलेली बातमी
आय.ई.एस. दिगंबर पाटकर विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव तसेच माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून विद्यार्थी कौतुक सोहळा मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
नवीन विद्यार्थ्यांचे आकर्षक सजावट, फुलांच्या माळा, व स्वागत फलकांच्या साक्षीने टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कांचन सुनील सावंत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. भारतीय संस्कृतीतील गुरूजनांविषयी आदर व्यक्त करण्याच्या भावनेतून विद्यार्थ्यांनी शाळेच्या पायरीला नमस्कार करून आपल्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात केली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व वह्यांचे वितरण करण्यात आले.
याच दिवशी शाळेच्या उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरीच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून विद्यार्थी कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सन २०२५-२६ मध्ये शालांत परीक्षा शाळेचा १००% निकाल, इयत्ता पाचवी, सातवी व शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी, NMMS, INSPIRE Award, तसेच Elementary व Intermediate परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान बक्षिसे देऊन करण्यात आला.
नवीन विद्यार्थ्यांचा आनंददायी प्रवेशोत्सव आणि माजी विद्यार्थ्यांनी जपलेले शाळेशी असलेले ऋणानुबंध यामुळे हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरला.
Our Principal Madam Mrs. Prachi P. Borkar selected as Head's Represntative in Governing Council for the year 2018-19.